---Advertisement---
चोपडा

धानोरा हायस्कूलच्या चेअरमनपदी प्रदीप महाजन व जगदीश पाटील

---Advertisement---

Dhanora News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । सातपुडा शिक्षण संस्था भुसावळ संचलित झि. तो. महाजन माध्यमिक व ना.भा.पाटील ज्यूनिअर कॉलेज धानोरा येथे रविवारी (ता.१३) सकाळी दहा वाजता नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली. यात माध्यमिक शाळेच्या चेअरमन पदी प्रदीप विष्णू महाजन तर प्राथमिक इंग्लिश मेडियम स्कुलच्या चेअरमन पदी जगदीश पंढरीनाथ पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

jalgaon 2022 11 14T120422.072

धानोरा हायस्कूलमध्ये झालेल्या संस्थेच्या बैठकीत शालेय सदस्य समितीत माध्यमिकच्या संचालक पदी बी. एस. महाजन, वामनराव भावडू महाजन, योगेश चुडामण पाटील, सागर हुकूमचंद चौधरी यांची तसेच प्राथमिक इंग्लिश मिडियम स्कुलच्या संचालकपदी सुखदेवराव भावसिंग पाटील, बाजिराव वामन पाटील, राजमल दशरथ महाजन, डॉ रविंद्र चांगदेव चौधरी, ऍड. अविनाश काशिनाथ पाटील, पंकज भास्कर महाजन यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

---Advertisement---

सध्या शिक्षण स्पर्धात्मक झाले असून शाळेत नवनवीन उपक्रम राबविले जातील,शिक्षक व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले जाईल मी शाळेत लक्ष देऊन शाळेची गुणवत्ता सुधारणा करण्यावर भर देईल- प्रदीप महाजन, चेअरमन (माध्यमिक)

गावासह परिसरातील बरेचसे विद्यार्थी प्राथमिक शिक्षणासाठी बाहेरगावी जात असतात.त्यामुळे आता गावातूनच प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत कसा करता येईल याकडे विशेष लक्ष देण्याचे लक्ष राहील. जगदीश पाटील,चेअरमन (प्राथमिक)

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---