---Advertisement---
भुसावळ

भुसावळ जुना सातारा मुख्य चौकातील खड्डे ठरतायेत जीवघेणे!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२२ । भुसावळ शहरातील जुना सातारा चौकातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी प्रचंड खड्डे पडले असून नागरिकांना वाहन काढण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यांची तात्कळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रा. धिरज पाटील यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे केली आहे.

jalgaon 63

भुसावळ शहरातील हंबर्डीकर चौक ते लोखंडी ब्रिज रस्ता काँक्रिटीकरण कामामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. जामनेर रोडवरून जळगाव रोडवर येण्यासाठी जुना सातारा मुख्य चौकातून वाहतूक होत आहे. तसेच जळगावहून यावल, रावेरकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. सर्व प्रकारची अवजड वाहनेसुद्धा याच चौकातून वाहतूक करीत आहे.

---Advertisement---

तयामुळे जुना सातारा मुख्य चौकात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू असल्याने या खड्ड्यात पाणी साचून परिस्थिती आणखी बिघडणार असल्याने या रस्त्यावरील खड्ड्यांचे तातडीने डांबरीकरण किंवा मजबुतीकरण करण्याची मागणी प्रा. धिरज पाटील यांनी भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे केली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---