---Advertisement---
पाचोरा गुन्हे

पाचोऱ्यात इस्त्रायल विरोधात पोस्टर्स; पोलीस ॲक्शनमोडवर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | १४ ऑक्टोबर २०२३ | पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर (Israel) केलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत १२०० इस्रायली नागरिकांचा बळी गेला आहे. इस्त्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून इस्रायला पाठिंबा मिळत आहे. तर काही कट्टरपंथी मानसिकतेचे लोकं हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करत आहेत. याचं लोणं पाचोरा शहरापर्यंत येवून ठेपलं आहे.

pachora israel jpg webp

पाचोरा शहरात पॅलेस्टाईच्या समर्थनार्थ व इस्रायलविरोधात पोस्टर्सबाजी करुन शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकाकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे. देशमुखवाडी परिसरातील हुसेनी चौक व जारगाव चौफुली ते समर्थ पेट्रोलपंप दरम्यान महामार्गावर बायकॉट इस्त्रायल असे पोस्टर्स चिटकवण्यात आले आहे.

---Advertisement---

काही कट्टरपंथीयांकडून शुक्रवारी हमासच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात येतील, अशी शंका तपास यंत्रणांना होती. त्यामुळेच देशातील महत्वाच्या शहरांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तरीही देशातील अनेक कट्टरपंथीयांनी दहशतवादी हमासच्या समर्थनात निदर्शने केली. काही ठिकाणी इस्रायलचे झेंडेही जाळण्यात आले. काश्मीरसह तेलंगणाची राजधानी हैदराबाद, पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता, उत्तर प्रदेशातील लखनऊ, तामिळनाडूसह अनेक ठिकाणी कट्टरपंथीयांनी फलक घेऊन निदर्शने केली.

याचं लोणं आता थेट जळगाव जिल्ह्यातही पोहचले आहे. पाचोरा येथे शुक्रवारी रात्री देशमुखवाडी परिसरातील हुसेनी चौकात इस्त्रायल विरोधात पोस्टर्स चिकटवण्यात आल्याचे समोर आले. त्यावर बायकॉट इस्त्रायल असे लिहीले होते. मात्र रात्री पोलिसांनी ती पोस्टर्स काढून टाकत तणाव टाळण्याचा प्रयत्न केला मात्र शनिवारी सकाळी पुन्हा जारगाव चौफुली ते समर्थ पेट्रोलपंप दरम्यान महामार्गावर अज्ञातांनी इस्त्रायल विरोधातील पोस्टर्स महामार्गावर चिटकविण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे पाचोरा पोलीस अलर्टवर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार पोर्स्टर्स कुणी चिटकवले याचा शोध घेण्यात येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---