जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पाचोरा शहरात सर्वपक्षीय व विविध संघटनांतर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला

या बंदत सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. शहरातील व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. या बंदचे नियोजन सर्व पक्षांच्या वतीने करण्यात आले होते. नागरिकांनी सहानुभूतीपूर्वक बंदला पाठिंबा दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आ. किशोर पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

या वेळी पाचोरा बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, अॅड. अभय पाटील, सचिन सोमवंशी, अजहर खान, नितीन तावडे, डॉ. भरत पाटील, संजय जडे, विकास पाटील, रणजीत पाटील, सुनील पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण पाटील, अशोक पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, ३१ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता हुतात्मा स्मारक येथे सर्वपक्षीय तसेच दादा प्रेमी, कार्यकर्ते व हितचिंतक संघटनांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आ. किशोर पाटील यांनी केले आहे.











