⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

दररोज 50 रुपयाची गुंतवणूक करा अन् मिळावा 35 लाख, जाणून घ्या पोस्टाच्या ‘या’ योजनेबाबत

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । जर तुम्ही कमी जोखमीचा नफा किंवा गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल, तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची योजना फायदेशीर ठरू शकतात. कारण भारतीय डाकच्या ग्राम सुरक्षा योजनेत कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवता येतो. या योजनेत तुम्ही छोटी रक्कम गुंतवून मोठी रक्कम जमा करू शकता. म्हणजेच, जर तुम्ही दररोज 50 रुपये जमा केले तर तुम्हाला 35 लाख रुपये मिळू शकतात. चांगल्या परताव्यासह, जीवन विम्याचा लाभ देखील उपलब्ध आहे.

काय आहेत नियम आणि अटी ?

ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी अर्जदाराचे वय 19 ते 55 वर्षे दरम्यान असावे. या योजनेअंतर्गत तुम्ही किमान १०,००० ते १० लाख रुपये गुंतवू शकता. योजनेचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते. प्रीमियम भरण्यासाठी ग्राहकाला ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. पॉलिसी टर्म दरम्यान डिफॉल्ट झाल्यास, ग्राहक पॉलिसी पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रलंबित प्रीमियम भरू शकता.

ही पॉलिसी घेतल्यानंतर 4 वर्षांनी तुम्ही त्यावर कर्जही घेऊ शकता. तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाख रुपयांची ग्राम सुरक्षा योजना खरेदी केल्यास, 55 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा 1515 रुपये प्रीमियम भरावा लागेल. 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये जमा करावे लागतील. या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदाराला दररोज सुमारे 50 रुपये म्हणजेच एका महिन्यात 1500 रुपये जमा करावे लागतील.

गुंतवणूकदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत, ही रक्कम व्यक्ती 80 वर्षांची झाल्यावर त्याच्याकडे सुपूर्द केली जाते. जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर ही रक्कम त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसाकडे जाते. ग्राहक 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करणे निवडू शकतो. मात्र, अशावेळी त्याचा काही फायदा होणार नाही.

पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इंडिया पोस्टने ऑफर केलेला बोनस आणि अंतिम घोषित बोनस प्रति वर्ष 1,000 रुपये प्रति 60 रुपये. याविषयी अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी (भारतीय पोस्ट) संपर्क साधू शकता.