⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

पोस्टाची भन्नाट योजना ; दररोज गुंतवा फक्त ९५ रुपये आणि मिळवा १४ लाख रुपये

कमी कमाईमुळे, लोक सहसा लहान गुंतवणूकीवर मोठ्या नफ्यासारख्या योजनांवर लक्ष केंद्रित करत असतात. अशांसाठी पोस्ट ऑफिसची ही योजना एक उत्तम पर्याय ठरू शकेल. या योजनेत दररोज ९५ रुपये गुंतवून तुम्ही १४ लाख रुपये कमावू शकता. या स्कीमचे नाव आहे पोस्ट ऑफिस स्कीम ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा. ही पॉलिसी त्या लोकांसाठी खुप लाभदायक आहे, ज्यांना वेळोवेळी पैशांची आवश्यकता असते.

ही योजना १५ ते २० वर्षांसाठी आहे. ही पोस्ट ऑफिसची एंडॉमेंट योजना आहे. यामध्ये तुम्हाला मनी बॅकसह मॅच्युरिटीवर एकरकमी पैसे दिले जातात. जर एखादी व्यक्ती पॉलिसीच्या परिपक्वता नंतर अद्याप जिवंत असेल तर त्याला पैसे परत मिळण्याचा लाभ देखील मिळतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, पॉलिसी धारकाला विमा रक्कम तसेच बोनस विमा रक्कम दिली जाते.

रूरल पोस्टल लाईफ इंश्युरन्स स्कीमची सुरुवात भारत सरकारने १९९५ मध्ये केली होती. या अंतर्गत ग्राम सुमंगल स्कीम सुद्धा येते. या अंतर्गत पाच आणखी विमा स्कीम ऑफर करण्यात आल्या आहेत.

कोण घेऊ शकतो लाभ?
-कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
-या पॉलिसीसाठी किमान वय १९ वर्षे आणि कमाल ४५ वर्षे आहे.
-पॉलिसी १५ ते २० वर्षे घेता येते. 20 वर्षांचे पॉलिसी घेण्यासाठी धारकाचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
-या पॉलिसीमध्ये कमाल विमा रक्कम २० लाख रुपये आहे.

किती हप्ता भरावा लागतो?
जर २५ वर्षांचा व्यक्ती ७ लाख रुपयांच्या सम अश्युर्डसह २० वर्षांची पॉलिसी घेत असेल तर त्याला दर महिन्याला २८५३ रुपये हप्ता द्यावा लागेल. म्हणजेच दररोज ९५ रुपये जमा करावे लागतील. याप्रमाणे वार्षिक हप्ता ३२,७३५ रुपये होतो. जर ६ महिन्याला द्यायचे असेल तर १६,७१ रुपये आणि तीन महिन्यासाठी ८,४४९ रुपये भरावे लागतात.

योजनेचा लाभ कसा मिळणार?
पॉलिसी २० वर्षांची असेल तर ८ व्या, १२ व्या आणि १६ व्या वर्षी २०-२० टक्के हिशोबाने प्रत्येकी १ लाख ४० हजार रुपये मिळतील. २० व्या वर्षी २ लाख ८० हजार रुपयांची सम अश्युर्ड रक्कम मिळेल. याशिवाय ४८ रुपए प्रति हजार वार्षिक बोनस यात समाविष्ट होईल. त्याप्रमाणे वार्षिक बोनस 33,600 रुपये होईल. 20 वर्षांमध्ये बोनसची ही रक्कम ६ लाख ७२ हजार रुपये होईल. अशाप्रकारे विमा धारकाला एकूण १३ लाख ७२ हजार रुपयांचा फायदा होईल.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी जवळील पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा….