---Advertisement---
कोरोना आरोग्य जळगाव जिल्हा प्रशासन

जानेवारीत तिसऱ्या लाटेची शक्यता, दररोज २ हजार कोरोना चाचण्या करा : जिल्हाधिकारी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात वाढत असून प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना विषाणूची पुढची लाट ही तीव्र स्वरुपाची असणार आहे. जानेवारी महिन्यात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला ही लाट येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे.

corona mask

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्स डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक यांची जमादार उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला २३ जानेवारीला होणाऱ्या पल्स पोलिओ कार्यक्रमासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यात लाभार्थ्यांची संख्या, बूथ तयार करणे, डोस किती लागणार, तसेच सुपरवायझर यांनी प्रशिक्षण घेणे आदीसंदर्भात सूचना करण्यात आल्या.

---Advertisement---

जिल्ह्यातील अजूनही काही तालुक्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. अशा तालुक्यांनी पहिल्या डोसचे लसीकरण शंभर टक्के पूर्ण करावे व दुसऱ्या डोस लसीकरणाचे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्या. ज्या भागात नागरिक लसीकरणास नकार देत असतील, तेथे जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशीही सूचना केली.

कोरोनाची तिसरी लाट ही तीव्र स्वरुपाची असणार आहे. राज्यात विशेषतः पुण्यात रुग्ण आढळून येत आहेत. येत्या जानेवारी महिन्यात जिल्ह्यात सुद्धा ही लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना चाचणी संख्या वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्यस्थितीला ७०० ते ८०० लोकांना दिवसाला कोरोना चाचणी होत असून, ही संख्या १५०० ते २००० पर्यंत न्यावी अशाही सूचना देखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---