बनावट दारूच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड, दिड लाखाचा मुद्देमाल जप्त

ऑगस्ट 20, 2022 1:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । बनावट देशी दारू विक्री कणाऱ्यांवर पोलिसांची छापा टाकला, यात सुमारे दिड लाखांचा मुद्देमालासह संशयिताच ताब्यात घेतले आहे. याबाबत अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 1 1 jpg webp

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या बनावट दारू तयार करण्याचा चालता-फिरता कारखाना चालवला जात आहे. या ठिकाणी तीन चार तासात स्पिरिटपासून बनावट दारू तयार करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवार दि. १९ ऑगस्ट रोजी पथकातील अधिकारी आणि अंमलदार जानवे तालुका अमळनेर शिवारात गेले असता तेथे संशयित दिनेश प्रभाकर भावसार रा. पाटील गढी, भालेराव नगर, अमळनेर आणि भटू वसंत पाटील रा. जानवे, ता. अमळनेर (शेतमालक) यांच्याकडे १ लाख ४१ हजार १२० रुपये किमतीच्या ४२ बॉक्समध्ये ४८ बाटल्याप्रमाणे एकूण २०१६ बनावट दारूच्या बाटल्या आणि बनावट दारू बनवण्याचे साहित्य मिळून आले. दरम्यान, दोघांना अटक करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत

यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, नागपूर विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पोलीस नाईक कैलास शिंदे, पोलीस नाईक हितेश चिंचोरे, पोलीस नाईक योगेश महाजन, पोलीस कॉन्स्टेबल भुषण पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now