वकीलांवर पोलिसांचा हल्ला.. निलंबित करण्याची मागणी!

सप्टेंबर 28, 2022 7:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । शहादा येथील सहाय्यक सरकारी वकील एडवोकेट गणेश बागुल यांना शहादा पोलिसांनी मारहाण करून हात फ्रॅक्चर केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी एरंडोल वकील संघाच्या वतीने येथील तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

jalgaon 2022 09 28T191105.102 jpg webp

पोलिसांनी ऍड. बागुल यांना अरेरावी करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली तसेच ऍड.विपुल कदम यांना देखील गंभीर मारहाण करण्यात आली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश होऊन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, असे मागणीचे निवेदन तहसीलदार सुचिता चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी एरंडोल वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट एम. ओ. काबरा, सचिव ज्ञानेश्वर महाजन, एडवोकेट प्रतिभा पाटील व इतर वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now