यावल

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे ३ मुलांना विषबाधा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । यावल तालुक्यातील चितोडा येथे चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे ३ मुलांना विषबाधा झाल्याचा प्रकार आज बुधवारी दुपारी उघडकीस आला. विषबाधा झालेल्यामध्ये दोन जणांवर यावल रुग्णालयात उपचार सुरु असून एकला भुसावळ येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, चितोडा येथे आज जि.प.शाळेच्या अंगणात खेळत असताना वरून योगेश इंगळे, कृष्ण किरण पाटील, दुर्गेश चंदू पाटील या तिघांनी चंद्रज्योती या फळाच्या बिया फोडून खाल्ल्या. मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागला. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. सदर बाब लक्ष्यात येताच नागरिकांनी त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यामधील वरून इंगळे या मुलाला पुढील उपचारासाठी भुसावळ येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, मुलांना उलट्या होत असल्याचे लक्ष्यात घेत त्यांना गावातील सरपंच सलीम तडवी, पोलीस पाटील पंकज वारके, ग्रा.प.सदस्य मनोज पाटीलसह आदींनी तिघांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रज्योतीच्या बिया लहान मुलांसाठी घातक?

रस्ताच्या कडेला किंवा शाळेच्या परिसरात झुडुपांसारख्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या या वनस्पतीची फळं आकर्षक असल्याने लक्ष वेधून घेतात. परंतु चंद्रज्योतीचे फळ किंवा बिया खाल्ल्याने लहान मुलांना विषबाधा होत असल्याचे दिसून आले आहे. काजुच्या बिया समजून लहान मुलं या बिया फोडून खात असल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालं आहे. फळ खाल्यानंतर लहान मुलांना वारंवार उलट्या, ओटी-पोटात वेदना होतात, तोंडातून फेस येतो. तसेच त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी यावर लक्ष्य देणे गरजेचे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button