जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील सावखेडासीम येथे गटारी वरील ढापा बांधण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क भीक मांगो आंदोलन केले.
सावखेडासीम येथील चौकात ग्रामपंचायती समोरील गटारी वरील ढापा नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे वाहन धारकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होतो. हा ढापा बांधण्यात यावा यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे सातत्याने मागणी केली. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. यामुळे अब्दुल तडवी, दिनेश पाटील, सलीम तडवी, साकीर तडवी, सुनील भालेराव, नागो साळवे, अमिन तडवी आदींनी ढापा दुरुस्तीसाठी चक्क भीक मांगो आंदोलन केले.