⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | सरकारी योजना | PMMVY Yojna : गरोदर मातांसाठी केंद्र सरकारची योजना, ६००० रुपयांचा लाभ मिळेल; जाणून घ्या योजनेबाबत?

PMMVY Yojna : गरोदर मातांसाठी केंद्र सरकारची योजना, ६००० रुपयांचा लाभ मिळेल; जाणून घ्या योजनेबाबत?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरु केल्या आहेत. यात गरोदर मातांसाठी देखील केंद्र सरकारने योजना सुरु केलीय. २०१७ मध्ये ही योजना सुरू केली. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना आर्थिक मदत दिली जाते. त्यात त्यांच्या बाळाला ही वेतन मिळते. यात पहिल्या मुलाच्या बाबतीत ५००० रुपयांची रक्कम आणि दुसऱ्या अपत्यासाठी, ६००० रुपयांचा लाभ तुम्ही घेवू शकता.

केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेत स्त्रियांना चांगलाच लाभ मिळतो. यात गरोदर माता , स्तनदा माता आणि नवजात बालकांना यात लाभ मिळतो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत महिलांना ५००० रुपये मिळतात. यात तीन टप्पे असतात.

पहिल्या टप्प्यात नोंदणी केल्यानंतर एक हजार रुपये रक्कम मिळते. दुसऱ्या टप्प्याने गर्भधारणेला ६ महिने झाले की २ हजार रुपये मिळतात. तिसऱ्या टप्प्यात प्रसुतीनंतर बाळाच्या पहिल्या लसीकरणानंतर २ हजार रुपये मिळतात.

या योजनेचा लाभ कोण कोण घवू शकतं?
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही गरोदर महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहे. ज्या महिला अंशत: ४० टक्के अपंग आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्याचसोबत ज्या महिलांकडे ई-श्रम कार्ड आहे त्या महिला याचा लाभ घेऊ शकतात. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असेल त्या या योजनेत सहभाग घेवू शकतात.

अर्ज कुठे भरायचा?
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ १९ वर्षावरील गर्भवती महिलांना घेता येतो. या योजनेचा अर्ज तुम्ही https://wcd.delhi.gov.in/wcd/pradhan-mantri-matru-vandana-yojana-pmmvy या अधिकृत वेब साईटवर जावून भरु शकता. त्यात तुमच्याकडे आधारकार्ड, बाळाच्या जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, पॅनकार्ड या कागदपत्र असायला हवी.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.