⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

प्लॉट विक्री प्रकरण : नायब तहसीलदारांसह क्लार्क यांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । बनावट आदेशाने प्लॉट विक्री प्रकरणात अटकेत असलेले भुसावळ नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व शाम तिवारी यांना गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे

भुसावळातील जनकल्याण अर्बन संस्थेचे विशेष वसूली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांचे आदेशाचे बनावट सही व शिक्का याचा वापर करीत संस्थेचे दहा प्लॉट परस्पर विक्री केले होते. तर धांडेसह संस्थेचे प्लॉट घेणार्‍या दहा जणांविरूध्द येथील शहर पाोलिस ठाण्यात १७जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील धांडे यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व लिपीक शाम तिवारी यांना अटक करण्यात आली व न्यायालयान त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती व मुदत गुरुवारी संपताच न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीआहे.