भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले : पिंपळगावचे दोघे चुलतभाऊ ठार

जुलै 11, 2021 10:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२१ । भुसावळ | राष्ट्रीय महामार्गावरील जाडगाव फाट्यानजीक भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील दोघे तरुण चुलतभाऊ ठार झाले. रविवारी दुपारी चार वाजता हा अपघात झाला. सोपान रमेश मावळे (19) व सचिन सुभाष मावळे (18) अशी मयतांची नावे असून अपघातप्रकरणी ट्रक चालकाविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

pimpalgoan accident 2 youth

महामार्गावर अपघातांचे सत्र कायम
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सोपान रमेश मावळे (19) व सचिन सुभाष मावळे (18) दोघे तरुण दुचाकी (एम.एच.14 सी.टी. 4798) ने दीपनगर येथून घरी परत येत असताना जाडगाव फाट्यानजीक समोरून येणारा ट्रक (एम.एच.15 एफ.व्ही.1413) ने जोरदार धडक दिल्याने सचिन हा जागीच ठार झाला तर सोपान यास गंभीर अवस्थेत वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवत असताना त्याचीही प्राणज्योत मालवली. अपघातस्थळावरून चालक ट्रक चालक पसार झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories