⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

भुसावळात विविध कार्यालयांना सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । भुसावळ येथे सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघ, जळगाव मार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शासकीय कार्यालयात सरदार वल्लभभाई यांची प्रतिमाभेट आणि गरीब गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले. अखंडतेचे उपासक, लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघ, जळगावमार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

तहसील कार्यालयात, गट साधन केंद्र, नगरपालिका शिक्षण मंडळ, इत्यादी शासकीय कार्यालयात सरदार वल्लभभाई यांची प्रतिमाभेट देण्यात आली. प्रसंगी निवासी नायब तहसीलदार शोभा घुले, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, नगरपालिका मंडळाचे लिपिक मुख्य लिपिकजगदीश पाटील यांना प्रतिमा भेट देण्यात आल्या. तसेच संध्याकाळी 50 गरीब गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले. यात विशेषतः रस्त्याच्या बाजूला उघड्यावर झोपणारे गरजू गरीब महिला, लहान मुले तसेच म्हातारी माणसे यांचा शोध घेण्यात आला आणि त्यांना प्राधान्य क्रमाने ब्लँकेट वाटप करण्यात आले.

सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रसन्ना बोरोले, पदाधिकारी योगेश इंगळे, विजय झोपे, दीपक टोके, हरीश कोल्हे, धनराज नेहेते, गिरीश महाजन, रमण भोळे, जयदीप फेगडे, जीवन महाजन, प्रदीप सोनवणे, समाधान जाधव, प्रदीप साखरे, बी.एन.पाटील, अमित चौधरी आदींसह उपस्थित होते.