गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ विजेत्यांचा जल्लोष

मार्च 30, 2026 4:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा कलागुणांच्या बळावर मनाच्या आत दडलेल्या प्रतिमेला एक नवे वळण मिळावे सुप्त गुणांना चालना मिळावी या उदात्त हेतूने महाविद्यालयांमध्ये फिनिक्स २के२६ (टेक्निकल इव्हेंट) चे .कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव, गोदावरी फाउंडेशन) या उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून श्री विनोद पाटील (सुप्रीटेंडिंग इंजिनीयर एमएसइडीसीएल, जळगाव) उपस्थित होते.

Phoenix 2K26 1 1

तसेच उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे (समन्वयक, तंत्रनिकेतन) डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता), डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), फिनिक्स कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. देवेंद्र फेगडे व सर्व विभाग प्रमुख हे व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या मान्यवरांची शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले त्यात त्यांनी फिनिक्स या कार्यक्रमात सादर करण्यात येणार्‍या सर्व इव्हेंट ची माहिती देताना महाविद्यालयामध्ये २३ वर्षापासून हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे हे नमूद केले.

अशा प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळते व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे, तसेच मल्टी डिसिप्लरी नॉलेज विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना विशिष्ट चाकोरी मध्ये न राहता किंवा फक्त पुस्तकी ज्ञान न बाळगता अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन प्रकारचे ज्ञान घ्यावे, जेणेकरून या ज्ञानाचा उपयोग बाहेरील जगात त्यांना करता येईल. तसेच त्यांनी जागतिक घडामोडींचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी नमूद केला व त्या माध्यमातून स्वतःच्या स्किल्स डेव्हलप करा. डॉ. वर्षा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या दैनंदिन गरजा ओळखून त्याप्रमाणे नियमावली करणे गरजेचे आहे.

त्यामुळे आपल्याला वेळेचे महत्व कळेल व वेळ वाया जाणार नाही. तसेच अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये नेहमी सहभाग नोंदवावा असे सांगितले.फिनिक्स २०२६ या कार्यक्रमांमध्ये ७०० च्या वर प्रतिस्पर्धींनी सहभाग नोंदविला. बक्षीस समारंभाला फिनिक्स २ के २६ या कार्यक्रमाचे प्रायोजक इग्नाइट अकॅडमी, पॅशन सॉफ्टवेअर जळगाव, किरण अकॅडमी पुणे, सॉफ्टेड, इलेक्ट्रोसॉफ्ट व एम सॉफ्ट यांची उपस्थिती होती. फिनिक्स २घ२६ पारितोषिक विजेते विद्यार्थीकोड वॉर प्रतीक भदाणे, रीवा चव्हाण, हर्षल बोरसे कॅड गुरु, प्रणित साळुंखे२ पूर्वेस अत्तरदे३ पंकज साळी फॉर्म्युला फन१ ओम पाटील, डिंपल भंगाळे,दुर्गेश चौरे बॅटल ऑफ ब्रेन्स, पौर्णिमा थोरात२ पंकज सोनार३ क्षितिज शहा वेब क्राफ्ट एआय१ राज सूर्यवंशी२ मेघराज दंडगव्हाळ, मोनिका राखंडे पोस्टर प्रेझेंटेशन१ देवयानी महाजन व चिन्मय पाटील२ अथर्व देशमुख व राजवर्धन ठाकूर,गौतम चंदनी शार्क टँक१ भावेश राठोड व कुणाल देवरे२ प्रांजल बावणे३ निर्मल वरखेडे व गायत्री व्यवहारेफ्री फायर, शिवराज पाटील, कार्तिकेश पाटील, उत्कर्ष चुडीवाले व रोहित पाटील२ मंगेश महाजन, यश पाटील, आदर्श कोळी व प्रज्वल पाटीलबीजीएमआय१ कुणाल कावळे, परेश तायडे यश कोल्हे व सोहन (व्हर्टेक्स गँग)२ वरून चव्हाण, ऋषी सुतार व जयेश तायडे (चॉकलेट गँग) विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयामार्फत प्रथम पारितोषिक ३००० रुपये व द्वितीय पारितोषिक २००० रुपये तसेच तृतीय पारितोषिक १००० रुपये व सर्व विजेत्यांना ट्रॉफी असे बक्षीस तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले .गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव) डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉक्टर वैभव पाटील (डी एम कार्डिओलॉजिस्ट), डॉ. अनिकेत पाटील यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा वाघुळदे व रिद्धी भिरुड या विद्यार्थिनींनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. देवेंद्र फेगडे तसेच सर्व कमिटी मध्ये असलेले शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now