⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

वाहनधारकांना मिळणार दिलासा.. पेट्रोल आणि डिझेल ‘या’ दिवशी स्वस्त होणार! जाणून घ्या आजचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । मागील गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. मात्र तरी देखील देशांतर्गत बाजारात साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर समान पातळीवर राहिले. क्रूडमध्ये अजूनही सातत्याने घसरण सुरू असून सणासुदीच्या काळात जनतेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.

क्रूडची किंमत $82 वर पोहोचली
सध्या जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड 88.34 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आहे. त्याचप्रमाणे, WTI क्रूडची किंमत $ 82.34 प्रति नगावर घसरली आहे. तेलाच्या किमती घसरल्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल. यापूर्वी महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला होता.

आजचा काय आहे भाव?
जळगावमध्ये आज पेट्रोलची किंमत १०७. ६० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९४.०३ प्रति लिटर इतकी आहे. आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत.

तुमच्या शहरातील आजची किंमत (पेट्रोल-डिझेल ८ सप्टेंबर रोजी)

हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर
लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
जयपूरमध्ये पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटर
तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
पाटण्यात पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर
गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
चंदीगडमध्ये पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर