⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

Petrol-Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । पेट्रोलियम कंपन्यानी आज सोमवारचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहे. त्यात आजही पेट्रोल (petrol), डिझेलचे (diesel) दर स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर राहण्याचा आज सलग तेरावा दिवस आहे. इंधनाच्या दरात शेवटची भाववाढ ६ एप्रिल रोजी करण्यात आली होती. दिनांक 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात इंधनाच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली.

आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १२१.६९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर १०४.३४ रुपये इतका आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.30 रुपये असून, डिझेल 104. 30 रुपयांवर पोहोचले आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे. रंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.

आज कच्च्या तेलाच्या दरात तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाचे (crude oil) दर 9 टक्क्यांनी वाढले असून, ते 111.23 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे शनिवारी जेट फ्यूलचे (Jet fuel) दर देखील वाढवण्यात आले आहेत. मात्र देशात आजही पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.