Petrol Diesel Rate : पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा कायम, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

जून 1, 2022 10:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । देशातील तेल कंपन्यांनी आज (बुधवार), 1 जून 2022 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. सलग १० व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज जाहीर झालेल्या नवीन दरानुसार जळगावात पेट्रोल ११२. १९ रु. प्रति लिटर तर डिझेल ९७.३४ रु.प्रति लिटर पर्यंत विकले जात आहे.

petrol diesel rate jpg webp

दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. पेट्रोलवर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये अबकारी कर कमी करून सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशन संतप्त झाले आहे.

तेलाच्या किमती सतत स्थिर राहिल्याने आणि नंतर दर कमी केल्याने त्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे पंपमालकांचे म्हणणे आहे. त्यांच्या कमिशनमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही, त्यामुळे आर्थिक नुकसान सोसावं लागल्याचा निषेध म्हणून देशभरातील ७० हजार पेट्रोल पंप चालकांनी आज मंगळवारी ३१ मे २०२२ रोजी इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.92 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.25 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.73 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.97 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 98.89 रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 95.54 इतका आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.78 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.25 रुपये इतका आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच आहेत. मुंबईत आज एक लीटर पेट्रोलचा भाव १११.३५ रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये इतका आहे. कोलकात्यात १०६.०३ रुपये आणि चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.६३ रुपये झाला आहे. बंगळुरुमध्ये पेट्रोलचा भाव १०१.९४ रुपये इतका असून चंदीगडमध्ये ९६.२० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now