जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२५ । पेट्रोल आणि डिझेलमुळे वाहन चालवणे अशक्य आहे. अनेकजण ऑफिसला जाताना किंवा कॉलेजला जाताना कार किंवा बाईक घेऊन जात असल्यामुळे रोज पेट्रोल डिझेलचा खर्च करावा लागतो. देशात मागच्या अनेक महिन्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहे. विशेष आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्वस्त होऊनही सरकारकडून पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त करून वाहनाकरकांना दिलासा दिला जात नाहीय.

सध्या पेट्रोल डिझेलचे दर खूप वाढल्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत आहे. मात्र आता सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज तब्बल ५.४७ लाख बॅरलने हे उत्पादन वाढवले जाणार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची उपलब्धता वाढणार आहे. याचाच परिणाम असा होईल की, पेट्रोल डिझेल आणि इंधनाच्या किंमती कमी होतील.

रशिया, सौदी अरेबियासह अनेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला फायदा होणार आहे. भारत हा कच्चे तेल आयात करतो. त्यातील सर्वाधित तेल हे रशियाकडून घेतले जाते. त्यामुळे जर उत्पादन वाढले तर कच्च्या तेलाच्या किंमती आपोआप कमी होतील. या एका निर्णयामुळे भारताला खूप फायदा होऊ शकतो. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.
आजचे पेट्रोल डिझेलचे दर
जळगावात पेट्रोलची किंमत १०५.५० रुपये आहेत. डिझेलचे दर प्रति ९१.३७ लिटर
पुण्यात पेट्रोलचे दर १०४.१० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलचे दर ९०.७१ रुपये आहेत.










