⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | वाणिज्य | Petrol-Diesel Rate : इंधनाचे नवे दर जारी; काय आहे आजचा पेट्रोल, डिझेलचे दर?

Petrol-Diesel Rate : इंधनाचे नवे दर जारी; काय आहे आजचा पेट्रोल, डिझेलचे दर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२२ । सरकारी तेल कंपन्यांनी आज शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिनाभरापासून तेलाच्या किमती स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटची दर वाढ ही सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. सहा एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

नव्या दरानुसार आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर 121.69 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर 104.34 रुपये इतका आहे.दरम्यान, कच्चे तेल महागले असून ब्रेंट क्रूड आता प्रति बॅरल $ 111.70 च्या आसपास आहे. देशात 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यामुळे इंधन दरवाढीने होरपळून निघालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळत आहे.मात्र, 22 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 10 रुपयांची वाढ झाली होती.

इतर मोठ्या शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.30 रुपये असून, डिझेल 104. 30 रुपयांवर पोहोचले आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.

गेल्या मार्च महिन्यामध्ये जळगावमध्ये पेट्रोलचा दर 111.29 रुपये प्रति लिटर इतका होता, त्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल दर सलग वाढत गेले. 1 एप्रिलला पेट्रोल 117.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले होते. तर 6 एप्रिलपर्यंत वाढत ते 121.69 पोहोचले. तेव्हापासून पेट्रोल दर स्थिर आहे. एका महिन्यात पेट्रोल जवळपास 10 रुपयाने महागले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.