⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

कच्चे तेल पुन्हा भडकले ! तपासा आजचा पेट्रोल डिझेलचा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । जागतिक बाजारात कच्चे तेल पुन्हा भडकले आहे. तरी देखील देशांतर्गत बाजारात तेल कंपन्यांनी आज सलग 28 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. नव्या दरानुसार आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर 121.69 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर 104.34 रुपये इतका आहे.

दरम्यान, कच्चे तेल महागले असून ब्रेंट क्रूड आता प्रति बॅरल $ 111.70 च्या आसपास आहे. देशात 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यामुळे इंधन दरवाढीने होरपळून निघालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळत आहे.मात्र, 22 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 10 रुपयांची वाढ झाली होती.

इतर मोठ्या शहरातील दर
मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.51 आणि 104.77 रुपये एवढा आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये एवढा आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.30 रुपये असून, डिझेल 104. 30 रुपयांवर पोहोचले आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लिटर 120.15 तर डिझेल 102.89 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 120.15 तर डिझेल 104.40 रुपये लिटर आहे.

गेल्या मार्च महिन्यामध्ये जळगावमध्ये पेट्रोलचा दर 111.29 रुपये प्रति लिटर इतका होता, त्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल दर सलग वाढत गेले. 1 एप्रिलला पेट्रोल 117.93 रुपये प्रति लिटरवर पोहोचले होते. तर 6 एप्रिलपर्यंत वाढत ते 121.69 पोहोचले. तेव्हापासून पेट्रोल दर स्थिर आहे. एका महिन्यात पेट्रोल जवळपास 10 रुपयाने महागले आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.