⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | ग.स. कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीच्या रकमेत कपात करुन वाढविला स्वत:चा मीटिंग भत्ता

ग.स. कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीच्या रकमेत कपात करुन वाढविला स्वत:चा मीटिंग भत्ता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२४ । ग.स. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीच्या रकमेत कपात करुन स्वत:चा मीटिंग भत्ता ५०० रुपयांवरुन २ हजार रुपये करुन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ग.स.अध्यक्ष उदय पाटील व संचालकांच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

ग. स. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर २२ दिवसांची ग्रॅच्युइटी देण्याचा नियम होता; परंतु अध्यक्ष उदय पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणत साडेसोळा दिवसांचा नियम आणला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना साडेपाच दिवसांची ग्रॅच्युइटीची रक्कम कमी मिळत आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक व नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे धाव घेतली आहे.

दोन्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्याचे आदेश पारित झाले; परंतु अध्यक्षांनी या निर्णयांना केराची टोपली दाखवली. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आता न्यायालयात धाव घेत अन्यायाविरुद्ध दाद मागितली आहे. अध्यक्ष पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे निवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान ५ ते ९ लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे, असे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.