⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | आमदार राजूमामा भोळे यांना जनता एक लाखाच्या मताधिक्याने निवडून देईल; ना. गिरीश महाजन

आमदार राजूमामा भोळे यांना जनता एक लाखाच्या मताधिक्याने निवडून देईल; ना. गिरीश महाजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे हे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनात्मक प्रचार करावा असा विश्वास भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.ते भाजपा व्यवस्थापन समितीची बैठक झाली, त्यावेळी बोलत होते. जळगाव शहर विधानसभा निवडणुकीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी यावेळी जाहीर करण्यात आली.

इतर पक्षाच्या तुलनेत भाजपाची संघटनात्मक बैठक झाली. या बैठकीस जळगाव लोकसभेचे प्रभारी व राज्यसभेचे खासदार बन्सीलाल गुजर यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये जळगाव शहर विधानसभेच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी बन्सीलाल गुजर यांनी विविध समित्यांची सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना समजून सांगितली. तसेच आपल्याला दिलेले काम योग्य प्रकारे आपण सांभाळून करायचे असे त्यांनी सूचना दिल्या.

याप्रसंगी ना. गिरीश महाजन यांनी, जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत मागच्या वेळी सुद्धा जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्याने आमदार सुरेश भोळेनिवडून आले होते असे सांगून त्याच अनुषंगाने यावेळेसदेखील जळगाव शहरातून आमदार भोळे यांना एक लाखाच्या मताधिक्याने जळगावची जनता निवडून देईल असे आत्मविश्वासाने कार्यकर्त्यांना सांगितले. सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने पक्षाच्या व महायुतीच्या ऊमेदवाराचा प्रचार करून शासनाच्या व केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत आ. सुरेश भोळे, शहर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी, शहर विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, सरचिटणीस अरविंद देशमुख, महेश जोशी, जितेंद्र मराठे, ज्योती निंभोरे, किशोर ढाके, सुभाष शौचे आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.