नागरिकांनो आत्ताच सावधान व्हा अन्यथा वेळ निघून गेलेली असेल
जळगाव लाईव्ह न्युज | २ सप्टेंबर २०२१ | गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना नियंत्रित झाल्याचे चित्र दिसत आहे. दिवसागणिक कोरोनाची आकडेवारी देखील कमी होत आहे.यामुळें नागरिकांचे स्वतःवरील नियंत्रण सुटताना दिसत आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय अभ्यासक नोंदवत आहेत. यामुळे नागरिकांनी आता तर सतर्क झालं तर ठीक अन्यथा स्वतः केलेल्या चुकीची शिक्षा भोगायला नागरिकांना लागणार आहे.
जिल्ह्यासह राज्याने कोरोनाचा २ लाटांचा तडाखा पाहिल्यानंतर आता कुठे परिस्थिती रुळावर आली आहे. या दोन्ही लाटांमध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता. ज्यामुळे लॉकडाऊन शिवाय सरकार पुढे इतर कोणताही पर्याय नव्हता त्याचा फटका सर्वच व्यावसायिकांना बसला आहे. मात्र आता ज्या प्रमाणे नागरिक सर्व ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. व ज्या प्रकारे नागरिकांनी मास्कचा वापर करणेदेखील बंद केला आहे. यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला नागरिकच जबाबदार असणार असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे.
मास्क घालण्याची नितांत गरज
कोरोनाची तिसरीला जर रोखायची असेल तर मास्कचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे नागरिकांनी मास्क घालणे अत्यंत अनिवार्य आहे मात्र नागरिक मास्क घालत नसल्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे.