रेल्वेचे प्रवाशांना विशेष गिफ्ट : उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२३ । संपूर्ण देशात प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता. रेल्वे प्रशासनाकडून लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कानपूर दरम्यान २६ साप्ताहिक विशेष गाड्या आणि पुणे ते विरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन दरम्यान २६ साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

स्पेशल कानपूर सेंट्रल येथून ७ एप्रिलपासून ३० जूनपर्यंत (१३ फेऱ्या) दर शुक्रवारी ३.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २.५५ ला पोहोचेल. भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज आणि फतेहपूर याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत..

स्पेशल विरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन येथून ५ एप्रिलपासून ते २८.०३.२३ (१३ फेऱ्या) पर्यंत दर बुधवारी १२.५० ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.३५ ला पुणे येथे पोहोचेल. दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापूरम, भोपाळ, विदिशा, बीना आणि ललितपूर असे थांबे आहेत.