जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. कारण अजून किमान तीन दिवस तरी तापमानापासून सुटका होण्याची चिन्हे नाहीत. मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार ७ एप्रिलपर्यंत कमाल तापमान ४४ ते ४३ अंशांदरम्यान राहील. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मे हिटचे तडाखे बसू शकतील. या मुळे उष्माघाताचा असलेला धोका वाढला आहे.
…तरच तापमानात घट
मंगळवारी जळगावचे तापमान ४३.५ अंश होते. ते सरासरी ३९.९ अंशांपेक्षा ३.६ अंश जास्त होते. उष्णतेची ही लाट अजून तीन-चार दिवस कायम राहील. बंगालच्या खाडीत काही सिस्टिम तयार झाली आणि दक्षिणेकडून हवा बाष्प घेऊन आली तरच तापमानात काहीशी घट होऊ शकते. – डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख, हवामान विभाग, आयएमडी, पुणे
जळगावात उन्हाच्या तीव्रतेने यंदा विक्रमी पातळी गाठली आहे.
कुठे पाऊस, कुठे उष्णता
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन-तीन दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावू शकतो. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मात्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.