अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

मार्च 7, 2023 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्युज । ५ एप्रिल । २०२२ शहरातील जळगाव भुसावळ रस्त्यावरील मलिक नगर येथे पायी जाणाऱ्या ५५ वर्षीय वृद्धास भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याची घटना दिनांक १ एप्रिल रोजी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाला असून या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
अधिक असे की, अर्जुन नगर येथील रहिवासी रघुनाथ जयराम चव्हाण ५५ हे दिनांक १ एप्रिल रोजी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास जळगाव भुसावळ रस्त्यावरील मलिक नगर येथे गॅस एजन्सी जवळून पायी जात असताना मागून येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत रघुनाथ हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी रिक्षातून सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेसंदर्भात पोलिसांनी मयताचा मुलगा कुणाल चव्हाण यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती कळवली. माहिती काळातच त्यांनी सामान्य रुग्णालयात धाव घेत पाहिले असता त्यांनी मयत हे आपले वडील असल्याचे ओळखले. घटनेच्या दोन दिवसानंतर कुणाल चव्हाण यांनी घटनास्थळावर जाऊन माहिती घेतली तसेच परिसरातील लोकांशी चर्चा केली असता त्यांना कळाले की, त्यांचे वडील हे रस्त्याने पायी जात असताना मारुती ईको वाहन क्रमांक एम.एच. १९ एक्स ९४०७ वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत रघुनाथ यांना मागून धडक दिली. सदर वाहन चालक हा वडिलांच्या मरणास कारणीभूत असल्याबाबतची तक्रार कुणाल चव्हाण यांनी दिनांक ५ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील तपस पोलीस करीत आहेत.

crime 18 jpg webp

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now