पाटील विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । स्त्री ही क्षणकाळची पत्नी व अनंतकाळची माता आहे. ती एक अगाध शक्ती चे रूप आहे. आज समाजात ती अनेक रुपात पाहायला मिळते. अशा या स्त्री चे महात्म विद्यार्थ्यांना समजावे व आज तिने घेतलेल्या उंच भरारीचे दर्शन व्हावे, यासाठी केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात महिलादिना निमित्त एका छानशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थिनींनी यावेळी डॉक्टर , शिक्षिका, गृहिणी , सफाई कामगार , शेतकरी , इंजिनियर , खेळाडू, पोलीस , योगशिक्षिका अशा अनेक भूमिका साकारल्या. इ. ४ थी च्या विद्यार्थिनीनी आपण समाजात किती महत्वाच्या भूमिकेतून काम करतोय हे एका गीतातून सादर केले. काही विद्यार्थिनींनी छान माहिती सांगितली. मुख्या. रेखा पाटील यांनी महिला दिन का साजरा केला जातो त्याची सुरुवात कशी झाली ते सांगितले. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.