जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । येथील नशिराबाद श्रीराम मंदिर संस्थानतर्फे रविवारी १७ रोजी गावातून वाद्यांच्या गजरात प्रभू श्रीरामांचे जयघोष करीत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी श्रीराम नामाचा गजर करण्यात आला.
श्रीरामाच्या मूर्तीस मंगल महाराज धर्माधिकारी यांनी पंचामृत महास्नान अभिषेक केला. त्यानंतर उत्सवमूर्ती पालखीत विराजमान करून आरती करण्यात आली. मिरवणुकीत धर्मरक्षक ग्रुप व मित्र परिवार ग्रुप श्रीराम व हनुमान पेठ मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझीम नृत्य सादर केले. काल्याचे अभंग होऊन महाआरती व प्रसाद वाटप आणि सोहळ्याची सांगता झाली. प्रथम पालखी उचलण्याचा परंपरेचा मान नाईक व देशपांडे घराण्याकडे आहे. त्यानुसार विवेक नाईक, विलास नाईक, मनोज नाईक, दिनू नाईक, अमेय नाईक, सुनील देशपांडे, अलोक देशपांडे, अॅड. प्रदीप देशपांडे, सुधीर मोहरीर, दीपक नाईक, गजाबापू नाईक आदींनी पालखीचे पूजन करून प्रथम पालखी उचलली. कार्यक्रमास मंगल धर्माधिकारी, राजेश्वर धर्माधिकारी, प्रसाद धर्माधिकारी, रामू धर्माधिकारी, नरेंद्र धर्माधिकारी, विनायक धर्माधिकारी, प्रशांत धर्माधिकारी यांचे सहकार्य लाभले. जयंत वाणी, सुनील कासार, मोहन खारे, राजेंद्र पाटील, बापू पाटील, संदीप रणधीर, धर्मरक्षक ग्रुप, श्रीराम व हनुमान पेठ मित्र मंडळ व मित्र परिवार आदींचे सहकार्य लाभले.