⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

चिंताजनक : ..तर देशातील इंधनाचे दर वाढतील : डॉ.भागवत कराड

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धाचे परिणाम जागतिक स्तरावर उमटत आहेत. लवकर हे युद्ध थांबले नाही तर यामुळे आगामी काळात देशातील इंधनाचे दर वाढू शकतील, असे संकेत अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी दिले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. कराड हे रविवार, २७ रोजी नाशिक दाैऱ्यावर आले असताना ते बोलत होते. कराड म्हणाले, युक्रेनमधून देशात कच्च्या तेलाची निर्यात हाेत असते. मात्र, रशियाबराेबर झालेल्या युद्धामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. यामुळे आगामी काळात देशावरही त्यांचा परिणाम हाेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, दर वाढू नये यासाठी उच्च स्तरावरून प्रयत्न सुरू असून यासाठी ठाेस उपाययाेजना करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे ठाेस पावले उचलली जातील. तसेच महागाई वाढत असली तरी त्यावर उपाययोजना करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. इंधन दरवाढ होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून योग्य ते पाऊल उचलले जाईल, असेही डॉ. कराड यांनी सांगितले.