प्रवाश्यांनो.. कृपया लक्ष द्या : नागरपूर विभागातील २२ रेल्वेगाड्या रद्द!
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । नागपूर विभागाने ८ ते १३ ऑगस्ट दरम्यान २२ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. स्टील साइडिंगच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. रक्षाबंधन ताेंडावर असताना रेल्वे विभागाने ब्लाॅक घेतल्याने प्रवाशांची गैरसाेय होणार आहे.यामुळे प्रवाशी नाराज झाले आहेत.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये नागपूर विभागाचे स्टील साइडिंग चालू करण्यासाठी स्टेशनच्या पॅनलचे यार्ड संशोधन आणि बदल रद्द करण्यासाठी रेल्वेने ब्लाॅक घेतला. परिणामी भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल २२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नागपूर विभागात नाॅन इंटरलाॅकिंगचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. परिणामी या कामामुळे ८ ऑगस्टपासून रेल्वे प्रशासनाने हा ब्लाॅक घेतला. भुसावळ विभागातून धावणाऱ्या २२ गाड्या रद्द केल्या आहेत
.१८०३० शालिमार – लोकमान्य टिळक टर्मिनस, १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते शालिमार ८ ते १२ ऑगस्टपर्यंत रद्द, २२८४६ हटिया-पुणे ८ ते १२ अाॅगस्ट तर १० ते १४ अाॅगस्ट, १३४२५ मालदा टाउन – सुरत ६ ते १३ अाॅगस्ट रद्द, १३४२६ सुरत-मालदा टाउन ८ ते १५ ऑ गस्टपर्यत रद्द, २२५८९४ हावडा-शिर्डी साईनगर ११ अाॅगस्टला रद्द, २२८९३ शिर्डी साईनगर – हावडा १३ ऑगस्टला रद्द. २२९०५ ओखा-शालिमार ७ अाॅगस्टला रद्द, २२९०६ शालिमार-ओखा एक्स्प्रेस ९ अाॅगस्टला रद्द, १२८१२ हटिया – एलटीटी १२ व १३ अाॅगस्टला रद्द, १२८११ एलटीटी – हटिया १४ व १५ ऑगस्टला रद्द, १२९०५ पोरबंदर – शालिमार १० व ११ ऑगस्टला रद्द, १२९०६ शालिमार – पोरबंदर १२ व १३ ऑगस्टला रद्द, १२८१० हावडा – सीएसएम टी ८ ते १३ ऑगस्ट या काळात रद्द, १२८०९ मुंबई – हावडा ८ ते १३ अाॅगस्ट रद्द, १२८३४ हावडा – अहमदाबाद ८ ते १३ अाॅगस्ट रद्द, १२८३३ अहमदाबाद – हावडा ८ ते १३ ऑगस्टला रद्द, हावडा पुणे व हावडा पुणे या गाड्या दिनांक ८ ते १३ ऑगस्टपर्यंत रद्द, १२१०१ एलटीटी – शालिमार ६, ७ व ९ अाॅगस्टला रद्द, १२१०२ शालिमार – एलटीटी ही गाडी ८, १० व ११ ऑगस्टला रद्द केली आहे.