⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

धक्कादायक! धावत्या बसमध्ये तरुणीचा विनयभंग, पाचोऱ्यातील प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : 8 जानेवारी 2024 : महिलांसह अल्पवायीन मुलींवर होणारे अत्याचार तसेच विनयभंगाच्या घटना सातत्याने समोर येत आहे. यामुळे महिला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपास्थित होतं आहे. दरम्यान आता धावत्या खासगी बसमध्ये तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अंधाराचा गैरफायदा घेत प्रवासातील तरुणीशी जवळीक साधत – तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना मालेगाव ते धुळे दरम्यान एका खासगी बसमध्ये शनिवारी सकाळी – घडली. याप्रकरणी धुळे शहर पोलिस – ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल – झाला. या प्रकरणी पोलिसांनी किशोर छगन पाटील (वय ४७, रा. – खाजोळ, ता. पाचोरा) याला अटक केली आहे.

याबाबत असे की,मालेगाव येथून धुळ्याच्या दिशेने एक खासगी ट्रॅव्हल्स निघाली होती. त्याच बसमध्ये धुळ्यातील एक तरुणी प्रवास करीत होती. मालेगाव येथून धुळ्याच्या दिशेने बस निघाल्यानंतर अंधाराचा गैरफायदा घेत बसमधील सहचालकाने संबंधित तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे तरुणी घाबरून गेली.

धुळ्यात बस दाखल झाल्यानंतर तिने पालकांसोबत शहर पोलिस ठाणे गाठले आणि संशयिताविरुध्द फिर्याद दाखल केली. त्यानुसार सहचालक किशोर छगन पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.