भुसावळ

प्रवाशांनो, लक्ष द्या.. ५ सप्टेंबरपर्यंत रेल्वेने केल्या ‘या’ मार्गावरील २४ गाड्या रद्द!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर यंदा प्रथमच मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजर केला जात आहे. त्यामुळे बाहेरगावला असलेले परिवार गावी जात असतात, त्यामुळे अनेक प्रवाशांनी गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करून ठेवले होते. मात्र, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या तरतुदीसाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग/नॉन इंटरलॉकिंग कामामुळे नागपूर मार्गावरील २४गाड्या ३०ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत रद्द केल्या आहेत. दरम्यान, सण, उत्सवाच्या काळात रेल्वे विभागाने हा निर्णय घेतल्यानं त्यांचा अगोदरच आरक्षण करून ठेवलेल्या प्रवाशांना फटका बसला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेने घेतलेल्या या रेल्वे रद्दच्या निर्णयामुळे प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शालिमार-एलटीटी शालीमार एक्सप्रेस (18030-18029) 30 ऑगस्ट ते 4 सप्टेबर, हावडा-मुंबई सीएसएमटी मेल (12810-12809) हावडा अमदाबाद हावडा एक्स्प्रेस (12834-12833), हावडा पुणे हावडा आझाद हिंद (12130-12129), एलटीटी शालीमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ही गाडी 30 ऑगस्ट, 2 व 3 सप्टेबर रद्द, शालीमार एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्पेस (12102) 1, 4 व 5 सप्टेंबरला रद्द, हातिया पुणे 2 सप्टेबर, पुणे हातिया एक्स्प्रेस 4 सप्टेबर, हाटिया – एलटीटी एक्स्प्रेस 2 व 3 सप्टेबरला रद्द, एलटीटी हटिया एक्स्प्रेस 4 व 5 सप्टेबरला रद्द, पारबंदर -शालीमार एक्प्रेस 31 ऑगस्ट व 1 सप्टेबरला रद्द, शालीमार पोरबंदर एक्स्प्रेस 2 व 3 सप्टेबरला रद्द, संत्रागाची-पुणे हमसफर एक्सप्रेस 3 सप्टेबर, पुणे- संत्रागाची हमसफर एक्सप्रेस 5 सप्टेबरला रद्द , हावडा-साईनगर शिर्डी एक्सप्रेस 1 सप्टेबरला रद्द, साईनगर शिर्डी – हावडा एक्सप्रेस 3 सप्टेबरला रद्द, ओखा-शालिमार एक्सप्रेस 4 सप्टेबर, शालीमार – ओखा एक्सप्रेस 6 सप्टेबरला रद्द, टाटानगर -इतवारी एक्सप्रेस 30 ऑगस्ट ते 4 सप्टेबर व इतवारी – टाटानगर एक्सप्रेस 30 ऑगस्ट ते सहा सप्टेबरपर्यत रद्द केली आहे.

दरम्यान, रेल्वेने ब्लॉक घेतल्याने रेल्वे गाड्या रद्द केल्या आहे, त्यामुळे प्रवाशांची गेरसोय होत आहे, प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, विकास कामांसाठीच ब्लॉक घेतला असल्याचे सिनीयर डीसीएम शिवराज मानसपुरे म्हणाले.

Related Articles

Back to top button