⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | प्रवाशांनो लक्ष द्या : 22 ऑगस्टपर्यंत मध्य रेल्वेच्या 19 रेल्वेगाड्या रद्द, भुसावळ मार्गे धावणाऱ्या या गाड्यांचा समावेश

प्रवाशांनो लक्ष द्या : 22 ऑगस्टपर्यंत मध्य रेल्वेच्या 19 रेल्वेगाड्या रद्द, भुसावळ मार्गे धावणाऱ्या या गाड्यांचा समावेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : 10 ऑगस्ट 2023 : रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी असून मध्य रेल्वेच्या १९ रेल्वेगाड्या तब्बल १४ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. यातील काही गाड्या भुसावळ मार्गे धावणाऱ्या आहेत. मुंबई-हावडा मध्य रेल्वेच्या चौथ्या मार्गाला सक्ती रेल्वे स्थानकाशी जोडण्याचा तसेच या स्थानकाचे ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे काम करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यामुळे काही गाड्या रद्द केल्या असून मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हावडा-मुंबई मुख्य मार्गावर सक्ती रेल्वेस्थानक आहे. सक्ती रेल्वेस्थानकाचे पुनर्निर्माण आणि या स्थानकाशी चौथी मार्गिका जोडण्याची तयारी सुरू आहे. नागपूर ते बिलासपूर आणि येथून झारसुगुडा या मार्गावर चौथा मार्ग टाकण्यात येत आहे. सध्या या मार्गाचे काम सुरू असून यातील काही विभागांमध्ये काम पूर्ण झाले आहे.

तर रेल्वेला हे काम पूर्ण करण्यासाठी आज म्हणजेच १० ते २२ ऑगस्टपर्यंत असा  १४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी मध्य रेल्वेच्या काही गाड्या १४ दिवस धावणार नाहीत.

मध्य रेल्वेच्या कोणकोणत्या गाड्या रद्द?

१४ ऑगस्ट १२८८० भुवनेश्वर – कुर्ला एक्सप्रेस.

१६ ऑगस्ट १२८७९ कुर्ला भुवनेश्वर – एक्सप्रेस.

१२ ऑगस्ट २०८२२ संत्रागाछी – पुणे एक्सप्रेस.

१४ ऑगस्ट २०८२१ पुणे-संत्रागाछी एक्सप्रेस.

१० ते २२ ऑगस्ट ०८७३८ बिलासपूर – रायगड मेमू पॅसेंजर स्पेशल

१० ते २२ ऑगस्ट ०८७३७ रायगड-बिलासपूर मेमू पॅसेंजर स्पेशल.

०९ ते २२ ऑगस्ट ०८७३६ बिलासपूर – रायगड मेमू पॅसेंजर स्पेशल

१० ते २३ ऑगस्ट ०८७३५ रायगड – बिलासपूर मेमू पॅसेंजर स्पेशल.

०९ ते २१ ऑगस्ट १८११३ टाटानगर – बिलासपूर एक्सप्रेस.

१० ते २२ ऑगस्ट १८११४ बिलासपूर-टाटानगर एक्सप्रेस.

०९ ते २१ ऑगस्ट १८१०९ टाटानगर – इतवारी एक्सप्रेस.

०९ ते २१ ऑगस्ट १८११० इतवारी – टाटानगर – एक्सप्रेस.

०९ ऑगस्ट २०८२८ संत्रागाछी-जबलपूर एक्सप्रेस.

१० ऑगस्ट २०८२७ जबलपूर-संत्रागाछी एक्सप्रेस.

१० ऑगस्ट १७००५ हैदराबाद-रक्सौल एक्सप्रेस.

१३ ऑगस्ट १७००६ रक्सौल-हैदराबाद एक्सप्रेस.

११ ऑगस्ट २२८४३ बिलासपूर-पाटणा एक्सप्रेस.

१३ ऑगस्ट २२८४४ पाटणा-बिलासपूर एक्सप्रेस.

१० ते २२ ऑगस्ट ०८८६१/०८८६२ गोंदिया – झारसुगुडा मेमू पॅसेंजर स्पेशल बिलासपूर आणि झारसुगुडा दरम्यान धावणारी ट्रेन

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.