जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसल्याचे दिसून येतेय. आता अशातच पारोळा तालुका अत्याचाराच्या एका घटनेने हादरला आहे.
15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. धक्कादायक म्हणजेच या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रवीण राजेंद्र सपकाळे (वय २२) या संशयित नराधमाला अटक करण्यात आलेली आहे.
नेमकी घटना काय?
पारोळा तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये गावात राहणारा संशयित आरोपी प्रवीण सपकाळे याने पीडित मुलीसोबत घरी एकटी असताना तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितलं तर तुझ्या बहिणीवर सुद्धा अत्याचार करेल अशी धमकी दिली होती.
दरम्यान १६ मे रोजी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला घरच्यांनी डॉक्टरांकडे नेलं. मात्र यावेळी तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे धक्कादायक माहिती समोर आले. या संदर्भात पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पारोळा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रवीण राजेंद्र सपकाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयताला अटक करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव जाधव करीत आहे.