मजुरीचे पैसे घेण्यापूर्वीच काळाचा घाला, शालक-मेहुणा ठार

ऑगस्ट 13, 2021 11:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२१ । उसतोड मुकादमाकडे मजुरीचे पैसे घेण्यासाठी जात असताना पारोळा-कासोदा रस्त्यावरील मोरफळ-मंगरूळ गावांदरम्यान दुचाकीला मालवाहू वाहनाने जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात शालक व मेहुण्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवारी घडली.

parola kasoda

मेहुणा लक्ष्मण बबन भील (वय २७) आणि शालक दीपक मंगा भील (वय ३०) असे मृताचे नाव असून ते दोघे पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील रहिवाशी आहे. ते दोघे टीव्हीएस दुचाकीला (क्र.एम.एच.१९-आर-०७२६) ने उसतोड मुकादमाकडे मजुरीचे पैसे घेण्यासाठी कासोदा येथे दुचाकीने जात होते.

वाटेत मोरफळ ते मंगरुळदरम्यान समोरून येणाऱ्या टाटा मॅजिक वाहन (क्र.एम.एच.२०-बी.वाय.३०८५) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांना जबर मार लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.  या घटनेचा हवालदार विजय भोई, सुनील वानखेडे, राहुल पाटील यांनी पंचनामा केला.

दरम्यान, दुचाकीला धडक दिल्यानंतर टाटा मॅजिक वाहनाचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

अपघातातील मृत लक्ष्मण बबन भील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, तर मृत दीपक मंगा भील यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. दोन्ही घरातील कमावते होते. तसेच चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे दोघांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे बहादरपूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now