डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन

जून 20, 2026 3:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आज दिनांक 20 जून 2026 रोजी गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, जळगाव येथे डीन डॉ. हर्षल बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले.

parents meeting

या सभेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नियमित उपस्थिती, महाविद्यालयातील शिस्त, अभ्यासक्रमाचे नियोजन, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत पालकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसंदर्भात विविध सूचना व अभिप्राय मांडले. महाविद्यालयाच्या वतीने पालकांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यात आले.

New Project 2

यावेळी डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालय व पालक यांच्यात सातत्यपूर्ण समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त व व्यावसायिक नैतिकतेचे पालन करून उत्कृष्ट आयुर्वेद वैद्य बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

या पालक-शिक्षक सभेस महाविद्यालयातील प्राध्यापक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now