जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. पंकज रमेश बोंडे यांनी एसएस वापरून वायर कट इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग प्रक्रियेच्या मशिनिबिलिटी ऑप्टिमायझेशनची अंमलबजावणी या विषयात संशोधन कार्य पूर्ण करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.

डॉ. पंकज रमेश बोंडे यांनी अत्यंत महत्त्वाच्या आणि तांत्रिक विषयावर आपले संशोधन पूर्ण केले आहे. आधुनिक उत्पादन क्षेत्रात आणि औद्योगिक प्रक्रियांमध्ये या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे. आपल्या संशोधनाद्वारे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हासजी पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्य सौ. डॉ. केतकीताई पाटील, सदस्य डॉ. वैभवजी पाटील, सदस्य डॉ. अनिकेत पाटील, सदस्य सौ. डॉ. अक्षता पाटील, तसेच गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांतजी वारके आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. विजयकुमार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.







