⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

वटारवासियांच्या वेदनेवर डॉ. केतकी पाटील यांनी घातली फुंकर

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुन २०२३ । चोपडा तालुक्यातील वटार या गावात गॅसच्या स्पोटमुळे चार कुटूंबावर मोठे संकट कोसळले, घटनास्थळी गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील यांनी जाऊन आपत्तीग्रस्त कुटूंबियांचे सांत्वन केले तसेच आरोग्य सेवेसाठी मदतीचा हात पुढे केला, इतकेच नव्हे तर त्या कुटूंबियांच्या जीवनाची घडी पूर्ववत बसावी याकरीता आपल्या टिमला पाठवून जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करुन सामाजिक बांधिलकी देखील डॉ.केतकीताईंनी जोपासल्याचे वटार ग्रामस्थांनी अनुभवले.


चोपडा तालुक्यातील वटार या गावी दोन आठवड्यांपुर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन गावच्या सरपंच भिकुबाई सुभाष कोळी, कैलास भिका कोळी, पांडुरंग सुभाष ठाकरे, धनसिंग खंडू ठाकरे या चार कुटुंबीयावर खूप मोठा आघात झाला. या स्फोटात त्यांची घरे जळून नष्ट झाली होती, खूप मोठी वित्तहानी झाली. या घटनेमुळे संपूर्ण गावच हादरले होते, अशा परिस्थीती २ जुन रोजी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.सौ.केतकीताई पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन आपत्तीग्रस्त परिवाराचे सांत्वन केले. याप्रसंगी आरोग्य समस्यांबाबत मदतीचा हातही डॉ.केतकीताईंनी पुढे केला.

मागील पाच दिवसांपासून डॉ.केतकी पाटील यांच्या मनात वटारचा अपघात व तेथील लोकांचा जीवनाबाबत विचारांचा कल्लौळ झाला होता. त्यावेळी डॉ.केतकीताई यांनी आपण आगग्रस्त कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तु देऊ असा निश्चय केला. आणि बुधवार दि.७ जून रोजी डॉ.केतकीताई यांच्या आदेशानुसार विश्वनाथ कोळी, स्वीय सहाय्यक भारत वाळके, किशोर महाजन, आरोग्यदूत जगदीश पाटील, उपसरपंच खुशाल पंढरीनाथ पाटील, माजी सरपंच बाळू दगडू ठाकरे यांनी वटार गावात जाऊन आगग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा केला. बिना संस्कार, नहीं सहकार..! बिना सहकार, नहीं उध्दार…!! डॉ.सौ.केतकीताई यांनी केलेल्या मदतीने त्यांच्यातील सामाजिक दायित्वाची प्रचिती आज वटारवासियांनी अनुभवली.