जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । जळगाव-चाळीसगाव महामार्गावरील वळण कमी करण्यासाठी प्रलंबित राहिलेल्या भूसंपादनाच्या कामाला जिल्हा प्रशासनातर्फे वेग देण्यात येत आहे. पाचाेरा-चाळीसगाव दरम्यान सहा गावातील ४.१४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्याची माेजणी झाली आहे. अवार्ड जाहिर करण्यात आले आहेत. हरकती आणि आक्षेपासाठी ६० दिवसांचा कालावधी देण्यात आलेला. असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. भूसंपादन प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरु करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
पाचाेरा ते चाळीसगाव दरम्यान रस्त्यासाठी सहा गावातील ४.१४ हेक्टर जमीन लागणार आहे. त्याची पहिली प्रक्रिया बाद झाल्याने नव्याने राबवली जाते आहे. त्यात माेजणी हाेऊन अवार्ड जाहिर झाले असून हरकती मागवण्यात आल्या आहेत. यापुढील थ्रीडी ड्राफ्ट तपासणी सुरु आहे महामार्गासाठी जळगाव ते पाचाेरा दरम्यान असलेले वळण व इतर कारणांनी अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामासाठी पूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया निर्धारीत वेळेत पूर्ण हाेऊ न शकल्याने पुन्हा नव्याने सुरु करण्यात अाली अाहे. रस्त्यासाठी २० गावातील २२.५४ हेक्टर जमिन लागणार अाहे. त्याची माेजणी करण्यात आली आहे. त्याबाबत हरकती मागवण्यात आले असून त्यासाठीचा नियमानुसार ६० दिवसांचा कालावधी सुरु आहे.
याच रस्त्यावरील शहरालगतच्या इच्छादेवी ते शिरसाेली गावाअगाेदरील इकरा काॅलेजपर्यंतचा रस्त्याचे काम महामार्ग प्राधिकरण, धुळे विभागातर्फे करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणातर्फे देण्यात आल्या आहेत.