⁠ 
रविवार, मे 12, 2024

पाचोऱ्यात तीन मजली इमारत कोसळली, सुदैवाने जीवित हानी टळली!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२१ । पाचोरा शहरातील बाहेरपुरा परिसरात बांधकाम करतांना पाच वर्षांपुर्वी काही तांत्रिक दोष राहिल्याने सोमवारी रात्री तीन मजली इमारत पत्त्याच्या कॅटप्रमाणे कोसळली. वेळीच दक्षता घेतलेली असल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली आहे.

शहरातील व्हीपी रोडवरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे गुंतवणूक म्हणून तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षापूर्वी बांधकाम करून घेतली होती. बांधकाम सदोष असल्याने इमारतीला तडे पडू लागले होते. काही दिवसांपूर्वी पावसाने इमारत शेजारच्या इमारतीपासून वेगळी होत असल्याचे लक्षात आल्याने भाडेकरू यांनी इमारत रिकामी केली होती.

सोमवारी रात्री रिमझिम चालणाऱ्या पावसाने १० वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली. वेळीच दक्षता घेतल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. नगर परिषदने हा रस्ता दक्षता म्हणून बंद केला होता. परीसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने अनर्थ टळला आहे. इमारत कोसळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.