जळगाव जिल्हा

एकलव्य क्रिकेट अकॅडमीच्या तीन खेळाडूंची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगावलाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय आमंत्रितांचा १६ वर्षाआतील क्रिकेट स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धांमध्ये केसीई सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुलाच्या एकलव्य क्रिकेट अकॅडमीतील पवन पाटील, कृष्णा महाजन व अनुज पवार या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये कृष्णा महाजन व पवन पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे तर अनुज पवार ह्याने नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.

पवन पाटील ह्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेत एकूण ४०७ रन काढले या कामगिरीमुळे तो महाराष्ट्रातील १६ वर्षाआतील टॉप पाच फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने स्पर्धेतील १८४ धावांची सर्वोत्तम खेळी नांदेड संघाविरुद्ध खेळली. पवन पाटील हा नगरसेविका प्रतिभा सुधीर पाटील यांचा सुपुत्र असून ओरियन स्टेट बोर्ड चा विद्यार्थी आहे. अनुज पवार ह्या खेळाडूने नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत संपूर्ण स्पर्धेत २१७ धावा केल्या. पवन पाटील, अनुज पवार, कृष्णा महाजन हे खेळाडू गेल्या चार वर्षापासून सातत्याने एकलव्य क्रीडा संकुलात मुख्य प्रशिक्षक पंकज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. ह्या खेळाडूंच्या यशाबद्दल एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी कौतुक केले. खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दल डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी पवन पाटील या खेळाडूस इंग्लिश विलो, अनुज पवार या खेळाडूस रबर स्टड शुज, व कृष्णा महाजन या खेळाडूस क्रिकेट गणवेश देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button