⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

रक्षा खडसेंच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ? एकनाथ खडसे म्हणतात..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२४ । केंद्रात तिसऱ्यांदा भाजपाप्रणित एनडीएचं सरकार स्थापन होत असून आज सायंकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. यावेळी त्यांच्यासोबत रावेरमधून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे देखील मंत्रिपदासाठी शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.

याच पार्श्वभूमीवर त्यांना फोन आला असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर खडसे कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे. रक्षा खडसे आज केंद्रात मंत्रिमंडळाची शपथ घेतली यामुळे माझं हृदय भरून आलं, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?
परिवारातील एक सदस्य केंद्रातील मंत्रिमंडळात जातोय याचा आनंद गगनाला भिडनारा आहे. ताईंनी भाजपमध्ये पक्षश्रेष्ठीवरचे निष्ठा ठेवली त्याचे हे फळ मिळतंय. माझ्याकडे आज बोलायला शब्द नाही, रक्षा खडसे आज केंद्रात मंत्रिमंडळाची शपथ घेतली यामुळे माझं हृदय भरून आलं आहे, असं नाथाभाऊ म्हणाले आहे. मी आता दिल्लीकडे निघत आहे असेही खडसे म्हणाले. एकंदरीत नाथाभाऊ हे आजच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहतील.