संतापजनक! लग्नाच्या आमिषाने तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध; जबरदस्ती गर्भपातही केला!

ऑक्टोबर 9, 2022 1:19 PM

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । अलीकडे लग्नाचे आमीष देऊन मुलींना फसविण्याचे, त्यांचे शोषण करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. यावल तालुक्यातील एका गावात देखील अशीच घटना समोर आली असून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारिरिक संबंध ठेऊन नंतर जबरदस्ती तीचा गर्भपात केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime girl rep

निलेश पंढरीनाथ पाटील असे संशयित आरोपीचे नाव आहे. २२ वर्षीय पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०२१ ते जुन २०२२ पावेतो वेळोवेळी संशयित आरोपी निलेश पाटील याने पिडीत तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी आजीच्या राहते घरी तसेच संशयित आरोपी निलेश याच्या मालकीच्या खळ्यामध्ये शारिरिक संबंध ठेवले. यातून पिडीत तरुणीला गर्भधारणा झाली. यानंतर निलेश याने पिडीत तरुणीच्या इच्छेविरुध्द गोळ्या-औषधी देऊन तीचा गर्भपात केला.

या प्रकरणी दि.८ ऑक्टोंबर रोजी बलात्कार, ऍट्रोसीटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now