---Advertisement---
मुक्ताईनगर

..अन्यथा, मुक्ताईनगरच्या स्टेट बँकेतील विविध समस्यांबाबत मनसेचे निवेदन!

---Advertisement---

Muktainagar news जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर स्टेट बँकेतील विविध समस्यांबाबत शाखा प्रबंधक यांना मनसेकडून तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. दरम्यान, दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून शाखा प्रबंधक याबाबत दखल घेतात का? याकडे तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.

jalgaon 2022 11 16T123104.824

येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत विविध समस्या आहेत. त्यात ग्राहकांपैकी वृध्द,विधवा, पेन्शनर,सामान्य खातेदारांना बँक व्यवहारासाठी सद्याच्या परिस्थितीत अवहेलना, फिरवाफिरव केली जात आहे. एकच खिडकी योजना, दहा हजारांहून कमी रक्कमेच्या व्यवहाराला जमा नावे करण्यासाठी ग्राहक सेवा केंद्राकडे पाठविले जाते तसेच मनीट्रान्स्फर सुध्दा केंद्रावर केली जाते. त्यामुळे सर्वा भार ग्राहक केंद्र चालकांच्या वर लादला जात आहे.

---Advertisement---

दरम्यान, मग आपल्या शाखा कर्मचारी कोणते काम करतात असा खडा सवाल मनसेचे तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांनी शाखा व्यवस्थापकांना केला आहे. शाखेवरच त्यांच्या हक्काचे व रुईखेडा गाव वरून ३१ वर्ष पूर्वी हस्तांतरित झालेली शाखा म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. तेव्हापासून खातेदारांनी १००रू.पासून तर लाख रुपयांपर्यंत शाखेवरच रक्कमा नावे जमा केल्या आहे म्हणून शाखेवरच व्यवहार करून घ्यावे, त्यांना ग्राहक सेवा केंद्रात पाठवू नये ग्रामीण भागात ठीक आहे.

पण शहरात आपली मनमानी कारभार चालू देणार नाही याची खबरदारी घ्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष मधुकर भोई,गण अध्यक्ष सुनील कोळी,मंगेश कोळी, संपर्क अध्यक्ष गणेश जुंबळे, नगीण भोई,योगेश भोई,आदी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---