थीम महाविद्यालयात विद्यार्थी विकास अधिकारी कार्यशाळेचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । इकरा शिक्षण संस्थाव्दारा संचलित एच.जे. थीम महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने थीम महाविद्यालय मेहरूण येथे एक दिवसीय ‘प्राचार्य/ संचालक व विद्यार्थी विकास अधिकारी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात कुराण पठणाने डॉ.अख्तर शाह यांनी केली. महाविद्यालयातील विद्यार्थीनिनी रीफत फातेमा याने इकरा संस्थे चे तराना- ए- इकरा गीत गाईले.
प्रस्तावना महाविद्यालया चे प्रभारी प्राचार्य आय.एम.पिंजारी यांनी केली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा.डॉ.बी.व्ही.पवार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार होते. कार्यक्रमात, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, सचिव एजाज मलिक, अब्दुल रशीद शेख, अमीन बाद्लीवाला, मजीद सेठ झकेरिया, प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, डॉ. राजेंद्र फालक, डॉ. राजेंद्र वाघुळदे, डॉ. आय. डी. पाटील, जिल्हा समन्वयक प्रा. पवन पाटील, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. क. ब. चौ. उ. म. वि. चे प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार, यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, “विद्यार्थ्यांना केंद्र बिंदू मानून आपले विद्यापीठ कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य, रोजगारक्षम कौशल्य इत्यादींचा विकास करणे गरजे चे आहे”.
कबचौ. उमवि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, “विद्यार्थी विकास अधिकारी यांच्या वर खूप मोठी जबाबदारी आहे व त्यांनी विद्यापीठा मार्फत मिळत असलेल्या अनुदानाचा पूर्ण विनियोग करावा”, असे आवाहन केले. एजाज मलिक यांनी आपल्या संबोधनात शिक्षकांचे स्थान समाजात खूप महत्वाचे आहे हे उपस्थितांना पटवून दिले. डॉ. इकबाल शाह यांनी विद्यार्थी विकास विभागा च्या वेगवेगळ्या योजनांचे विद्यार्थ्यांना कसे लाभ होईल, या साठी कोनकोनते प्रयत्न झाले पाहिजे, यावर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. अब्दुल करीम सालार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना “विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख करणे हि देश सेवा आहे आणि देश सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीची मोहीम आमच्या महाविद्यालयातून या कार्यशाळे द्वारे व्हावी” अशी अपेक्षा व्यक्त केली. व्दितीय सत्रात ‘व्यक्तिमत्त्व विकासात विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांचे योगदान’ या विषयावर माजी प्राचार्य तथा कबचौ. उमवि’च्या पंडित दिनदयाल उपाध्याय चेअर चे प्राध्यापक डॉ. विवेक काटदरे यांनी मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील कुलकर्णी यांनी विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत वार्षिक कार्यक्रम नियोजन आणि इतर महत्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करून सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत जळगाव जिल्हया अंतर्गत महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी विकास अधिकारी, सहायक विद्यार्थी विकास अधिकारी व महिला अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. मुजम्मील काजी यांनी केले. कार्यक्रामाच्या शेवटी उपस्थितांचे आभार महाविद्यालया चे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. राजेश भामरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता, प्रभारी प्राचार्य आय. एम. पिंजारी, प्रा. रेखा देवकर, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ.आयेशा बासीत, डॉ.चांद खान, डॉ. फिरदौस शेख, डॉ. युसुफ पटेल, डॉ. शकील फिरदौसी, डॉ. वकार शेख, प्रा. साजिद मालक, डॉ. शेख इरफान, डॉ. शबाना खाटिक, डॉ. दापके, डॉ. हाफिज शेख, डॉ. राजू गवरे, डॉ. अख्तर शाह, डॉ. तन्वीर खान, डॉ. मुस्तकीम, डॉ. कहेकशा अंजुम, डॉ.अमीन काजी, डॉ. उमर पठाण यांनी तसेच रफिक शेख, कामिल शेख, हमीद पटेल, असिफ शेख यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा :
- जळगावात 9वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मेळाव्याचे आयोजन; कुठे आणि कधी होणार?
- एकलव्य रेसिडेन्सी स्कूलच्या 1,257 जागांसाठी 23 फेब्रुवारीला प्रवेश पूर्वपरीक्षा
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?