⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

दोन वर्षांत तब्बल ‘इतके’ प्रेमीयुगल झाले भुर्रर्र…! पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२३ । शारीरिक आकर्षण, प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचे आमिष दाखवून मुलींसह महिलांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कुटुंबांचा विरोध डावलून पळून जाण्याचे प्रकारही वाढल्याचे येथील पोलिस ठाण्यातील नोंदीवरुन दिसून येत आहे. दोन वर्षांत ६७ तरुणी व महिला पळून गेल्याची नोंद करण्यात आली आहे. यात प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मोबाईल आता प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे तरुणाई सर्वाधिक वेळ सोशल नेटवर्किंग साइटवर खर्च करतात. सोशल मीडियातील ओळखीतून अनेक प्रेम प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच घर सोडून जाण्याचे किंवा मुलासोबत पळून जाण्याचे प्रकार घडतात.

शारीरिक आकर्षण, प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचे आमिष दाखवून मुलींसह महिलांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. कुटुंबांचा विरोध डावलून पळून जाण्याचे प्रकार वाढल्याचे येथील पोलिस ठाण्यातील नोंदीवरुन दिसून येत आहे. यात प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण अधिक आहे.

येथील पोलिस ठाण्यातील नोंदीवरुन दोन वर्षांत ६७ तरुणी व महिला पळून गेल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ हे आता खरे ठरू लागले आहे. गायब झालेल्या मुलींमध्ये १४ ते १८ वर्षातील मुलींचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. अगदी दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने प्रेमात पडून आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकली आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

पालकांनी मुलामुलींकडे लक्ष द्यावे
मुली बेपत्ता होणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकला असता, त्यात बहुतांश प्रमाणात त्यांचे पालकही तितकेच जबाबदार असल्याचे अभ्यासकांना दिसून आले आहे. अनेकदा पालकांकडून आपल्या पाल्यांना विश्वासात घेतले जात नाही. कामाच्या गडबडीत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. याचाच गैरफायदा मुले घेताना दिसतात.

मुलींना वेगवेगळे आमिष दाखवून दोघेही ‘सैराट’ होतात. त्यामुळे पालकांनी कामातून वेळ काढत आपल्या मुलामुलींना वेळ दिला पाहिजे. त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेऊन त्यांना प्रेम दिले पाहिजे. केवळ पैशांच्या मागे न धावता, आपले कुटुंब देखील हे विसरता कामा नये, असे पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचे देखील म्हणणे आहे.