जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । यावल युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी यावल येथे खरेदी विक्री संघाच्या परिसरात उद्या 7 रोजी सोमवारी सकाळी 10 वाजेला शरद युवा संवाद यात्राचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, यांच्या सोबत ‘शरद युवा संवाद यात्रा’ आयोजित करण्यात आलेली आहे. तरी या यात्रेत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युवक अध्यक्ष ऍड देवकांत पाटील व शहर अध्यक्ष हितेश गजरे यांनी केले आहे.
या यात्रेची सुरुवात जळगांव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मस्थान मौजे आसोदा ता.जि.जळगांव येथून दि.04.फेब्रुवारी 2022 संध्याकाळी 5 वाजता झाली ही यात्रा सर्व जळगांव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पोहचत असून यावल तालुक्यात दिनांक 7 रोजी सोमवारी सकाळी 10 वाजेला खरेदी विक्री संघातील परिसरात आयोजन केले आहे.
यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगांव जिल्हाध्यक्ष सह सर्व आजी- माजी आमदार, सर्व सेलचे सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राहणार आहेत . यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांशी जोडण्याचा मानस आहे. नव्याने राजकारणात येऊ पाहणारी युवकांची संख्या लक्षणीय आहे! त्यांना राजकीय प्रक्रियेच्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांची ‘राष्ट्रवादी विचारांची’ व विकासात्मक दृष्टिकोन असणारी फळी महाराष्ट्रात नव्या जोमाने निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही संवाद साधणार आहोत! या शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून नव्या ऊर्जेने युवकांच्या सोबत संवाद साधणार आहेत.. यावल तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.
हे देखील वाचा :
- निकालानंतर अजित पवारांची मोठ्या पदावर वर्णी
- निवडणूक झाली; आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबरचे पैसे कधी येणार?
- उद्या महायुतीचा शपथविधी? संभाव्य मंत्र्यांची नावे समोर, जळगावातील या आमदारांचा समावेश?
- महायुतीत मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग; कोण होणार मुख्यमंत्री?
- सोन्याने उधळला दरवाढीचा गुलाल; जळगावात आज प्रति ग्रॅमचा भाव किती?