पाचोरा येथे ‘सांज पाडवा’ कार्यक्रमाचे आयोजन

नोव्हेंबर 5, 2021 2:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या तर्फे शुक्रवार दि.५ रोजी सायंकाळी ५ वाजता स्वामी लॉन्स पाचोरा येथे ‘थोड्या गप्पा.. थोडी गाणी’, या बहारदार मराठी सुरेल गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

Saanj Padva jpg webp

‘सांज पाडवा’ असे या कार्यक्रमाचे शिर्षक आहे. अटल पणन योजनेचे ब्रँड ॲम्बेसिडर गणेश शिंदे दिग्दर्शित ‘थोड्या गप्पा… थोडी गाणी’, या कार्यक्रमात मराठी कलर्स वाहिनी वरील सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या महाविजेत्या सन्मिता शिंदे यांच्या सुमधुर आवाजात मराठी गीतांचे गीतांची मेजवानी रसिकांना लाभणार आहे. भडगाव रोडवरील स्वामी लॉन्स येथे आयोजित या मनोरंजक उद्बोधक कार्यक्रमाला समस्त पाचोरावासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now